चालकास अटक , पोलीसात गुन्हा दाखल
कन्हान : - कन्हान शहरातील जुने पोलीस स्टेशन जवळील ४५ पेक्षा कमी कोनाच्या मोड महामार्ग रस्तावर ट्रक च्या धडकेत वृद्धाचा मृत्यु झाल्याने पोलीसांनी चालकास अटक करुन गुन्हा दाखल केला आहे .
कन्हान जुने पोलीस स्टेशन जवळील ४५ पेक्षा कमी कोनाच्या मोड महामार्गरस्ता असल्याने वाहन चालक व पायदळी लोकांना सामोर एकाएकी दिसत असते . शुक्रवार (दि.२४) जानेवारी ला दुपारी १२.३० ते १ वाजता च्या दरम्यान जुने कन्हान पोलीस स्टेशन जवळील हनुमान मंदीरातुन दर्शन करुन कांद्री घरी जाण्यास महामार्ग रसत्यावर पायदळ आलेल्या वृद्ध इसम मेहतलाल भोजराज डेहरिया (वय ७५) रा.कांद्री यांना कामठी कडुन मनसर मार्गाने जबलपुर कडे जाणाऱ्या बाहर लाईनच्या दहाचाकी ट्रक क्रमांक एमएच ४० - एके ७३५५ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन वृद्ध इसमास जोरदार धडक मारल्याने वृद्धाचा घटनास्थळीच मृत्यु झाला .
सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील , सहायक पोलीस निरीक्षक राहुल चव्हान , वाहतुक पोलीस अनिल यादव , शैलेष वराडे , अमोल नागरे यांनी घटनास्थळी पोहचुन नागरिकांच्या मदतीने तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ऑटोच्या साहाय्याने नेले असता तेथील डॉक्टरांनी वृद्धाला मृत्यु घोषित केले .
कन्हान वाहतुक पोलीसांनी वेळीच दहाचाकी ट्रकचा पाठलाग करून धन्यवाद गेट कांद्री जवळ ट्रक ला पकडुन आरोपी ट्रक चालक चुनव प्रेमसिंग , अमरसिंग पलीयाड छत्तीसगड मंडला याला आणि ट्रक ला ताब्यात घेतले .
या प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी मुलगा पप्पु मेहतलाल डेहरिया (वय ४३)रा.कांद्री यांचा तक्रारी वरून आरोपी ट्रक चालका विरूध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे .
कन्हान प्रतिनिधि - ऋषभ बावनकर
0 टिप्पण्या
thank you for, you give me your most important time